रोगनिदान शिबीर:

सहकार महर्षी स्वः अण्णासाहेब पी. के. पाटील यांच्या जयंतीनिमित्त दर वर्षी रोगनिदान शिबीराचे आयोजन करण्यात येते.

सहकार महर्षी स्वः अण्णासाहेब पी. के. पाटील यांच्या ९५ व्या जयंतीनिमित्त रोगनिदान शिबीराचे आयोजन आले होते. नाशि, जळगाव, धुळे, नंदुरबार येथील नामांकीत डॉक्टरांनी दिवसभरात ५५३ रुग्णांची तपासणी केली.

श्री. पी. के. अण्णा पाटील फाऊंडेशन व विविध शहर ग्राम लेवा पाटीदार, ग्लोबल गुजर मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी स्व. अण्णासाहेब पी. के. पाटील यांच्या जन्मदिनी भव्य रोगनिदान शिबीर आयोजित केले जाते. पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात झालेल्या रोगनिदान शिबीराचे उद्घाट्न मंडळाचे अध्यक्ष श्री. दिपक पाटील, सचिव श्रीमती कमलताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

रविवारी दिवसभर चाललेल्या शिबीरात हॄद्यरोग तज्ञ डॉ. मनोज पाटील, दॉ. यतीन वाघ, पोटविकारतज्ञ डॉ. निखिल शिरोळे, डॉ. प्रशांत पाटील, किडनी मूत्ररोगतज्ञ दॉ. मोहन पटेल, दॉ. विकास राजपूत, डॉ. संदिप पाटील, मेंदू व मज्जासंस्था रोगतज्ञ डॉ. श्रीकांत बाम्हणे, डॉ. तुकाराम पाटील, मधूमेहतज्ञ डॉ. हेमकांत पाटील, व्यंधत्व निवारण तज्ञ डॉ. सुष्मा पाटील, डॉ. अरूण पाटील, प्लास्टीक सर्जरी तज्ञ डॉ. मुकेश सुर्यवंशी, डॉ. रोहन नेवाडकर, जनरल फिजिशियन डॉ. योगेश चौधरी, डॉ. मुकेश पाटील, डॉ. भूपेंद्र पाटील, डॉ. महेन्द्र पाटील, डॉ. हितेश पाटील, डॉ. जयेश पाटील, डॉ. जगदीश पाटील, डॉ. शिवनाथ पाटील, डॉ. हेमंत पाटील आदींनी रुग्णांची तपासणी केली. यातील काही रूग्णांची संदर्भसेवेसाठी निवड करण्यात आली. गरजू रुग्णांना यावेळी औषधीचे मोफत वाटप करण्यात आले. दिवसभर सुरु असलेल्या रोगनिदान शिबीरात ३०५ पुरूष तर २४८ महिला रूग्णांची तपासणी करण्यात आली.