कै. मा. अण्णासाहेबांच्या जन्मदिन म्हणजे ९ ऑक्टोबर या दिवशी किसान दिन व विचार मंथन दिन साजरा केला जातो. यादिवशी महाराष्ट्रातील सामाजिक, शैक्षणिक व संशोधन क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणा-या महाराष्ट्रातील व्यक्ती व संस्थेला श्री. पी.के.अण्णा पाटील फाऊंडेशन वतीने पुरुषोत्तम पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. पुरस्काराचे स्वरुप रु. १,००,०००/- व मानचिन्ह या स्वरुपाचे असते. आतापर्यंत हा पुरस्कार खालील मान्यवरांना व संस्थेला प्रदान करण्यात आलेला आहे.

अ. नं. वर्ष व्यक्ती संस्था
२००३ प्रा. राम ताकवले कुलगुरू, पुणे विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक
२००४ प्रा. डॉ. यु. म. पठाण औरंगाबाद (शैक्षणिक संत वांग्मय अभ्यास व संशोधन शिक्षण तज्ञ) महात्मा ज्योतिबा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी (कुलगुरू डॉ. सुभाष पुरी)
२००५ पद्मश्री विजय भटकर, पुणे, सुप्रसिध ज्येष्ठ संगणक तज्ञ, परम संगणकाचे निर्माते. चैतन्य अध्यात्मिक ज्ञान प्रसारक संस्था, पुणे, अध्यक्ष ह. भ. प. श्री बाबा महाराज सातारकर.
२००६ डॉ. वसंतराव गोवारीकर, पुणे, सुप्रसिद्ध ज्येष्ठ शास्त्रज्ञ, हवामान तज्ञ विक्रम साराभाई अवकाश केंद्र संचालक. महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, प्रा. डॉ. वि. भा. देशपांडे.
२००७ प्रा. डॉ. सुखदेव थोरात, चेअरमन, विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली. महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा, पुणे, अध्यक्ष श्री मोहन धारिया.
२००८ प्रा. डॉ. नागनाथजी कोत्तापल्ले, कुलगुरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव, कुलगुरू मा. डॉ. के. बी. पाटील
२००९ प्रा. डॉ. जयंत नारळीकर ज्येष्ठ गणिततज्ञ व भौतिक शास्त्रज्ञ, पुणे ---
२०१० मा. डॉ. दीपकराव टिळक, कुलगुरू, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे कुसुमाग्रज प्रतिष्ठान, विद्याविकास चौक, विद्या हॉस्पिटल समोर, गंगापूर रोड, नाशिक
२०११ मा. डॉ. बी. के. गोयल, डीन, बॉम्बे हॉस्पिटल, मुंबई. भगिनी निवेदिता ग्रामीण विज्ञान निकेतन, नीलिमा मिश्रा.
१० २०१२ डॉ. नरेंद्र जाधव सदस्य निती आयोग, भारत सरकार साधना ट्रस्ट पुणे
११ २०१३ डॉ. सदानंद मोरे (तत्वज्ञान विभाग) पुणे, विद्यापीठ पुणे हेल्पर्स ऑफ दी हॅन्डीकॅप कोल्हापूर
१२ २०१४ श्रीमती सिंधुताई सपकाळ पुणे सेवाग्राम आश्रम वर्धा
१३ २०१५ मा. डॉ. शरद पी. काळे (डॉ. भाभा अणुऊर्जा केंद्र मुंबई) डॉ. लाजपतराय मेहरा न्यूरोथेरपी आश्रम सूर्यमाळ जि. ठाणे
१४ २०१६ मा. श्री. पोपटराव पवार सरपंच हिवरेबाजार(अहमदनगर) पालवी संस्था पंढरपूर
१५ २०१७ मा. श्री. ना. धों. महानोर (कवी व माजी विधान परिषद सदस्य) इतिहासाचार्य वि. का. राजवाडे इतिहास संशोधन मंडळ, धुळे
१६ २०१८ मा. डॉ. ज्ञानदेव गंगाराम हापसे (ऊस संशोधन शास्त्रज्ञ, पुणे) मराठी विज्ञान परिषद, मुंबई